अध्ययन आणि अध्यापन
नाटकाचे प्रकार 2
डॉ. अक्षय घोरपडे.
नाटकाचे
आशयानुसार प्रकार
मागील भागात आपण नाटकाचे मुख्य प्रकार सुखात्मिका आणि शोकांतिका हे प्रकार अभ्यासले. या भागात आपण आशयानुसार नाटकाचे प्रकार पाहणार आहोत.
१.
पौराणिक नाटके :
मराठी रंगभूमीची सुरुवात मुळातच पौराणिक नाटकांनी झाली. इ.स. १८४३ ला कै. विष्णुदास
भावे यांनी मराठीतील पहिले पौराणिक नाटक 'सीता स्वयंवर' लोकासमोर सादर केले.
तत्कालीन लोकमानसावर धर्म, तत्त्वज्ञान, पुराणकथा, देव-देवता यांचा मोठा पगडा होता. त्यामुळे
पौराणिक नाटकांमधून विविध देव-देवतांच्या व्यक्तिरेखा साकारण्यात आल्या, पौराणिक नाटकांतील कथासूत्र हे पद्यात्मक स्वरूपाचे होते. कालांतराने
नाटकांतील कथासूच मांडण्यासाठी नेपथ्यासाठी पडद्यावर देखावे साकारण्यात आले.
पौराणिक नाटकांतील महत्त्वाची व लोकप्रिय व्यक्तिरेखा म्हणजे 'नारद'. अनेक पौराणिक नाटकांत पुराणातील संदर्भ व
नाटकांतील कथासूत्र यथायोग्य मांडण्यासाठी या व्यक्तिरेखेचा उपयोग करण्यात आला.
हळूहळू पौराणिक नाटकांचे स्वरूप बदलत गेले. १८८० नंतर अण्णासाहेब किर्लोस्करांनी 'शाकुंतल' या अनुवादीत नाटकाचा प्रयोग केला. त्यानंतर
त्यांचे 'संगीत सौभद्र' हे पौराणिक
नाटक लोकांच्या पसंतीला उतरले. अण्णासाहेबांनी आपल्या नाटकांना घटना, प्रसंग, संवाद, पद्यरचनांना
लयबद्ध चाली इ. वैशिष्ट्यांनी सादर केले. पौराणिक नाटकांचा विकास अण्णासाहेबांनी
केला. कृ.प्र.खाडिलकर यांनी पौराणिक नाटकांत विनोदी उपकथांचा समावेश केला.
खाडिलकरांनी नाटकांचे सादरीकरण पाश्चात्त्य नाटकांप्रमाणे केले. त्यामुळे
खाडिलकरांच्या नाटकांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली. पौराणिक नाटकांतून सादर
होणाऱ्या नाट्यगितांमुळे अनेक शास्त्रीय संगीतकार, गायक,
वादक नावरुपास आले. 'किचकवध', 'विद्याहरण', 'पहिला पांडव', 'संगीत
स्वयंवर', 'पहिला पांडव' या काही
गाजलेल्या पौराणिक नाटकांचा आवर्जून उल्लेख करावा लागतो.
२) ऐतिहासिक
नाटके :
ऐतिहासिक नाटकांत इतिहास आणि नाटक यांचा मेळ आपणांस पहायला मिळतो. वि.ज.
कीर्तने यांनी 'थोरले
माधवराव पेशवे' हे नाटक लिहून ऐतिहासिक नाटकांची पायाभरणी
केली. भूतकाळातील घटनांची नोंद इतिहासात सापडते. त्यामुळे इतिहास जाणून घेण्याचे
कुतूहल, इतिहासाबद्दलचे प्रेम, ऐतिहासिक
वारसा यामुळे ऐतिहासिक नाटके लोकप्रिय झाली. ऐतिहासिक नाटकांवर छत्रपती शिवाजी
महाराजांच्या जीवनचरित्राचा मोठा प्रभाव जाणवतो. शिवकाळातील घटना, प्रसंग, युद्ध यावर आधारित नाटके खूप लोकप्रिय झाली.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रावर आधारित नाटकांसोबतच छत्रपती संभाजी
महाराजांचाही विशेषप्रभाव ऐतिहासिक नाटकांवर जाणवतो ऐतिहासिक नाटकात भारदस्त
भाषणली, कौटंबिक चर्चा राजकारण युद्धप्रसंग पक्ष सामाजिक
परिस्थिती, मुस्लीम राजवट ३. पटना प्रसंग वास्तवरुपाने
साकारण्यात आल्या इतिहासाचे वास्त ऐतिहासिक नाटकातून साकारण्यात आले. कृ.प्र.
खाडीलकर यांचे 'भाऊबंदकी', रा.ग.गडकरी
यांचे 'राजसंन्यास’, 'सवाई माधवराव यांचा
मृत्यू’, 'कांचनगडची मोहना’, वसंत कानेटकर यांच 'रायगडाला जेव्हा जाग येते’, ‘जेथे गवताला भाले फुटतात’ या काही निवडक
ऐतिहासिक नाटकातून ऐतिहासिक नाटकाचे स्वरूप-विशेष जाणून घेता येतात.
३) सामाजिक
नाटके :
२० व्या शतकात सामाजिक नाटकाना महत्त्व प्राप्त झाले सामाजिक प्रश्नांची
मांडणी या नाटकांनी प्रामुख्याने केली. समाजमनावर असलेल्या पारंपरिक रूढी, परंपरा, अनिश
चालीरीती, श्री समस्या, वी पुरुष
समानता या प्रश्नांचा ऊहापोह सामाजिक नाटकांतून रंगभूमीवर करण्यात आला. समाज मनाला
जागे करून समाजात जागृती करण्याचे काम या नाटकांनी केली. सामाजिक प्रश्नांची गंभीरतेने
दखल या नाटकांनी घेतली. समाजव्यवस्थेसोबत ढासळणाऱ्या कुटुंबव्यवस्थेचेही बित्रण या
नाटकांनी केले. भ्रष्टाचार, व्यसनाधीनता व्यभिचार, सामाजिक नैतिक मूल्याचा होणारा हास हा विषयांनाही सामाजिक नाटकांतून
मांडण्यात आले. सामाजिक स्वरूपाचे नाटक मराठीत मोठ्या प्रमाणात लिहिल्या गेले.
इ.स. १८८५ ला म. फुले यांनी लिहिलेले 'तृतीय रत्न' नाटक हे पहिले सामाजिक नाटक पण त्याचा प्रयोग झाला नाही. १९ व्या शतकांत
सामाजिक नाटके फारशी तयार झाली नाही परंतु २० व्या शतकांत सामाजिक नाटकांचा प्रवाह
मोठ्या जोमाने सुरू झाला. समाजाचे भीषण वास्तव नाटकरुपाने प्रेक्षकांसमोर
मांडण्यात आले. श्री.कृ. कोल्हाटकर, पु.ल.देशपांडे, अनंत काणेकर, वि.वा. शिरवाडकर, वसंत कानेटकर या महत्त्वाच्या नाटककारांनी मराठी सामाजिक नाटकांना एक
वेगळी ओळख प्राप्त करून दिली. श्री.कृ. कोल्हाटकरांनी 'मतीविकार',
'प्रेमशोधन', 'मूकनायक', इ. नाटके श्री समस्या प्रधान सामाजिक नाटके आहेत. अनंत काणेकर यांचे 'घरकुल', आचार्य अत्रे यांचे 'लग्नाची
बेडी' वि.वा. शिरवाडकरांचे 'नटसम्राट'
या काही नाटकांनी सामाजिक प्रश्नांना संवेदनशीलतेने समाजासमोर
मांडले.
४) राजकीय
नाटके :
कृ.प्र. खाडिलकर यांच्यापासून राजकीय नाटकांची सुरुवात मराठी भाषेत दिसते.
लोकमान्य टिळकांच्या जहाल वृत्तीचा त्यांच्यावर प्रभाव होता. त्यामुळे टिळकांचे
अनुयायी म्हणून त्यांची ओळख होती. राजकीय विचार नाटकांतून मांडण्याचा त्यांनी
प्रयत्न केला. इंग्रजी राजवट, स्वातंत्र्याची चळवळ, इंग्रजी सत्तेला आव्हान,
इग्रजी सत्तेचा भारतीय समाजव्यवस्थेवर झालेला परिणाम इ. विषय
खाडिलकरांनी आपल्या नाटकांतून हाताळले. पौराणिक, ऐतिहासिक
नाटकांतून त्यांनी राजकीय संदर्भ दिलेत. क्रांतीची भाषा, क्रांतिकारक
नायक, बलिदान, क्रांतीची चळवळ, देशभक्ती यासारखा राजकीय विचार त्यांच्या नाटकांनी प्रेक्षकांसमोर मांडला.
टिळकांचा जहाल विचार खाडिलकरांच्या नाटकांनी मांडला. हळूहळू राजकीय नाटकांचे
स्वरूप बदलले आणि राजकारण, सत्तांतर, सत्तासंघर्ष,
असे विषय असणारी राजकीय नाटके निर्माण व्हायला लागली. भा.वि.
वरेरकरांनी १९४४ ला 'सिंगापुरातून' हे
पहिले राजकीय वातावरणाचे नाटक लिहिले. स्वातंत्र्योत्तर काळात बदलत्या राजकीय
व्यवस्थेचे चित्रण, राजकारण आणि खेडे, सत्तास्पर्धा,
निवडणूका, राजकारण आणि पैसा, भ्रष्टाचार, जातीयवाद इ. विषय प्रकर्षाने मांडले
गेले. आचार्य अत्रे यांचे 'मी मंत्री झालो', जयवंत दळवी यांचे 'सूर्यास्त', 'पुरुष', या नाटकांतून राजकीय संघर्ष आपणांस पहावयांस
मिळतो. लोकशाहीप्रधान देशात राजकीय महत्त्वाकांक्षेसाठी लोकशाहीची थट्टा
कशाप्रकारे राजकीय मंडळी करतात याचे भयावह वास्तव राजकीय नाटकांतून दाखविण्यात
आले.
५) विनोदी नाटके
:
लोकांचे मनोरंजन करमणूक व्हावी यासाठी विनोदी नाटकांची निर्मिती करण्यात आली.
मानवी स्वभावातील संगती, विसंगती खाचाखोचा नेमकेपणाने टिपून उपहासात्मक, विडंबनात्मक
पद्धतीने नाटकांतून दाखविण्यात आले. सुरुवातीला नाटकांत विनोद हा प्रसंगानुरूप व
आवश्यकतेनुसार होता. परंतु नंतर स्वतंत्र विनोदी नाटकांची निर्मितीच करण्यात आली.
हजरजबाबीपणा, खटकेबाज संवाद, खेळकर
वातावरण, सहजपणे केलेला कोटीबाजपणा हे विनोदी नाटकांचे विशेष
आहे. समाजातील विविध वृत्तीप्रवृत्तींवर विनोदाच्या साहाय्याने उपहासात्मकपणे टीका
करुन विनोद निर्माण केला जातो. राम गणेश गडकरी, आचार्य अत्रे,
पु.ल. देशपांडे इ. नाटककारांनी विनोदी नाटकांची निर्मिती करुन
प्रेक्षकांचे मनोरंजन केले.
६) दलित नाटके
:
१९६० ला मराठी साहित्यात दलित साहित्य प्रवाह निर्माण झाला. डॉ. बाबासाहेब
आंबेडकरांची प्रेरणा दलित साहित्याला मिळाली. तिच प्रेरणा १९८० च्यानंतर दलित
रंगभूमीला आहे. दलित चळवळीतून दलित रंगभूमीची निर्मिती आणि दलित नाटके निर्माण
झाली. दलित नाटकांचे महत्त्वाचा विशेष म्हणजे ते मनोरंजनासाठी नव्हते तर ते दलित
चळवळ अधिक तीव्र करण्यासाठी होते. दलित नाटके ही रंगभूमीवर सादर होण्याऐवजी दलित
सभा, संमेलनातून, अधिवेशनातून
सादर झाली. १९५६ ला म.भा. चिटणीस यांनी 'युगयात्रा' हे नाटक नागपूरच्या दीक्षाभूमीवर सादर केले. हा दलित नाटकाचा पहिला प्रयोग
जातिव्यवस्था, जातिभेद, धर्मातर,
वर्णव्यवस्था, यासारखे विषय दलित नाटकाने
हाताळले. डॉ. बाबासाहेबांचे विचार सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचविण्याचे काम दलित
नाटकाने केले. प्रेमानंद गज्वी यांचे 'तनमाजोरी', रामनाथ चव्हाण यांचे 'बामणवाडा', दत्ता भगत यांचे 'बाटापळवाटा', प्रकाश त्रिभुवन यांचे 'थांबा रामराज्य येतयं'
याशिवाय 'काळोखाच्या गर्भात', 'किरवंत', 'कोण म्हणतो टका दिला?' या दलित नाटकांनी दलित रंगभूमी समृद्ध केली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा