चिमणीची टोपी
चिमणी म्हणते
चिव चिव
कावळे दादा
टोपी शिव ||
कावळा म्हणतो
काव काव
घेऊन ये
चहा पाव ||
कावळ्याने शिवला
टोपीला गोंडा
चिमणी म्हणते
कर तो छोटा ||
चिमणीला दिसते
टोपी छान
कावळ्याची झाली
ताठ मान ||
कावळ्याचे झाले
कौतुक खूप
माकड म्हणते
हूप हूप ||
--डॉ. अक्षय घोरपडे.
टीप : सदर बालगीत हे डॉ. अक्षय घोरपडे यांनी लिहिलेले असून या गीताचे सर्व कायदेशीर हक्क हे डॉ. अक्षय घोरपडे यांचे आहेत.
सदर बालगीताची युट्यूबलिंक दिलेली आहे. https://youtu.be/rzi1fpqmbNE?si=pAfz9UDquR-TKEUA
