लेखक / कवी परिचय
‘मायूसी से बेहतर है दर्द’ म्हणणारा कवी : सुनील लोणकर (दर्द)
सुनील लोणकर (दर्द)
जालना जिल्ह्यातील सुप्रसिद्ध कवी. महाराष्ट्र राज्य विद्युत
महामंडळ (वीज कंपनीतून) येथून ऊपव्यवस्थापक लेखा
या पदावरून आगस्ट चौदा मध्ये सेवानिवृत्त.
मराठी आणि
हिंदी या दोन्ही भाषेत काव्यलेखन.
प्रकाशित
साहित्य : ‘
![]() |
| Sunil Lonkar |
हिंदी उर्दू गजल
१.
क्या लिखूँ?
नज़्म लिखूँ या ग़ज़ल,
क्या फ़साना लिखूँ
हक़ीक़ते ज़िंदगी है जुदा,
क्या तराना लिखूँ .
न जाने कौनसी तलाश में यहाँ तक आया
हूँ
मुसाफिरी हुई,
मुकाम नहीं, क्या ठिकाना लिखूँ .
उम्मीदें रंग भरके यारों ने बहलाया
है
बेरंग हूँ मगर यारो,
क्या जमाना लिखूँ .
सीने में साँसों का सैलाब लिए घूमता
हूँ
ग़मज़दा नहीं जिंदगी,
उसे क्या बहाना लिखूँ .
दर्द, जहाँ से निकला था, फिर वहीं आया हूँ
नशा है बेख़ुदी का,
गुम हूँ , खुद को क्या दीवाना लिखूँ ..
तेरे दर से गुजरते है !
तेरे शहर में अब हम कहाँ ठहरते
हैं,
रास्ते शहर के तेरी गली से
गुज़रते हैं !!1!!
दरवाज़ा बंद, मगर खिड़की होगी खुली,
यह सोचकर, तेरे
दर से गुज़रते हैं !! 2 !!.
कहते हैं, दवा
से बेहतर है परहेज़,
बात तजुर्बे की, मगर कौन यहाँ समझते हैं !!3!!. .
माना कि बुजुर्गों की राह पर है
चलना,
मुड़कर देखो, कभी रास्ते बदलते हैं !!4!!
हर क़ौम की रोशन-ए- उम्मीद,
नयी नस्ल है
मुताबिक़ रुख़ हवा के, वो कहाँ जलते हैं !!5!!
दिन रात को लेकर, उम्र गुज़र रही है,
‘दर्द’, दिल
थका नहीं, शौक़ में सुबह-शाम मचलते हैं !!.6!!
✍️ *सुनील लोणकर, ‘दर्द’
॰॰॰॰
ग़ज़ल
हम अपनी भी कहाँ,
कब ख़बर लेते हैं
अब साँस कहाँ,
बस! थोड़ा सा दम भर लेते हैं
हर वक़्त है,
एक मुजरिम की तरह सहमे हुए
वक़्ते रफ़्तार से,
दिन रात डर लेते हैं
सोचते हैं ,
ज़िन्दगी क्या यूँ ही गुज़र जाएगी
तेरे ख़्याल में मगर,
जरा सँवर लेते हैं
कड़ी धूप में ठहरे,
जो कभी घनी छाँव के लिए
तो कहा पेड़ों ने,
_‘धूप तो हम अपने सर लेते हैं’_
"दर्द " ज़मीन का तपना
भी ज़रुरी है
तो ही बादल,
समुंदर से पानी भर लेते हैं।
✍️ *सुनील लोणकर, “दर्द''
॰॰॰॰
४.
दुनिया फ़िदा है
तमाम उम्र जला हूँ,
रोशनी के लिए।
चराग़े हयात हूँ,
जिंदगानी के लिए ।।
धोखा देता रहा,
वही मुझे बार-बार।
जो राजे वाक़िफ़ था,
परेशानी के लिए।।
अब नश्तरे दामन हूँ,
बहारों से क्या गिला।
शायद मौसम ही आए थे,
वीरानी के लिए।।
परेशान तू भी न हो,
किसी ख़ुशी के वास्ते ।
मसर्रते रंजिश है यहाँ,
शादमानी के लिए ।।
"दर्द" दुनिया फ़िदा है,
अपनी ख़ूबसूरती पे ।
दिल की बातें बेकार है, आशकानी के लिए।।
✍️ *सुनील लोणकर "दर्द”
॰॰॰॰
मराठी कविता
१.
कविता आजही
तू कधी काळी बिंदू,
रेषा जोडून
छानशी रांगोळी काढायची.
त्यात तुझ ते रंग भरण,
तुझी ती तन्मयता, बघीतली म्हणजे,
मलाही शब्द आपसूक सुचायचे,
कवितेतील अर्थ ऊलगडायचे.
मनोमनी खुदकन हसणा ऱ्या बाळागत
कविता लुभवायची.
तसं शब्दाशिवाय काय जवळ होत माझ्या.
आता मात्र चष्म्यातून निरखून पाहाव
लागत त्याना.
रांगोळी पुसटसी व्हावी दुसऱ्या
दिवशी,
तसे अस्षटसे भासतात ते कधी कधी.
घराला छत हव,
तस मनाला कोंदण
अस वाटायच,
आता मात्र मोकळ आकाश हवहवस वाटत.
पौढत्वी सामंजस्य याव,
तशी कविता आजही.
ती शब्द छळ करत नाही.
अबाधित आहे. आजही.
✍️ *सुनील लोणकर.
॰॰॰॰
२.
दिवस कवितेचे होते ते.
शब्द बेलगाम नव्हते,
अर्थ काबूत होता.
मनाच्या तालावर होते जरी नाचणे,
पण त्यात डौल ,एक बाज होता.
कफ्फलक असतानांही कविताच जवळ होती,
दिमतीला.
डोंगर दरीकपारीतून घुमुन येणारे
आवाज,
आपलेच प्रतिध्वनी होते.
अनोळखी ही आपलीच वाटावी,
त्याकाळी माणसं एवढी सच्ची होती.
मनाच्या हळुवार तरलेतेच मोल म्हणजे कविता होती.
आता कवितेविषयी बोलतात लोक काहीबाही,
शब्दार्थातून मांडतात बडेजाव,
हुकमत गाजवायला पाहतात कवितेवर,
पण ऊधार असलेले शब्द ऊदार नसतात.
मनाचा ठाव त्याना सापडत नाही.
कवितेला तोलून मापून सजवून ठेवायला,
शब्द, अर्थ समजुतीचे लागतात
तह करावा लागतो केव्हा केव्हा.
मित्रा,
कवितेला जोपासण्यापेक्षा
सांभाळण,
जतन करणही गरजेच असतं केव्हा केव्हा.
✍️ *सुनील लोणकर
॰॰॰॰
३.
ऊरलोय खरा
मागे सरलो नाही पण आता ऊरलोय खरा..
पुढे गेलेली सर्व मला सारून
बघताहेत माझ्या कडे मागे वळून..
न्याहळतोय मग मीही स्वःताला,थोडंसं सावरून
निष्पर्ण जागी असतात जश्या गळतीच्या
खुणा,
चैत्रात पालवी फुटते याच जागेवरुन..
ऋतु अंगावर घेत ऊभी असतात जशी झाड
जमिनीत रोवून,
तसं काहीसं वाटतं मला स्वःताकडे
पाहून,
पिक निघाल्या नंतर बोडक्या रानात
पडलेला सरवा जसा वेचण्यालायक नसतो
पण परत तेच दाणे,बीज बनून उगवून येतात जमिनीतून पुढच्या मौसमात
तद्वतच काही राहिलेले,
उरलेले शब्द आता सजीव होऊन खुणावतात मला कवितेसाठी..
ताटकळत राहिले होते जे आजपावेतो
कवितेच्या दारासी
कदाचित त्यावेळी ते समर्पक नसतील,
अर्थहीनही वाटले असतील
पण जसे झाडांचे फुल फळण्याचे,बहरण्याचे खास मौसम असतात.
तसं काहीसं काही शब्दांच्या
बाबतीतही असतं.
हे समजतंय आता...
✍️ *सुनील लोणकर
॰॰॰॰
४.
तस तुला समजायला..
आई,
कधीही परत न येण्यासाठी,
ज्या वाटेनं निघून गेलीस तू,
त्या वळण वाटेवर ऊभा मीही,
तशी या कवीपणात काही कमी नाही,
पण काही तकलादू भ्रम पाळताना,
अपरिहार्यतेच जे जगण ऊरलय,
हतबल झालोय असं नाही,
पण तूझ्या असण्यान होत जे सशक्त बळ,
ते हिरावून गेल्यापासून खचून
गेल्यागत वाटतय.
भिंतीवरल्या फोटोत तू आजही किती भोळी,समजूतदार दिसतेस.
ऊमाळे दाटून येतात तूझ्या आठवणीचे.
पोरक करून गेलीस हे जरी खर,
पण केवळ तूझ्या मुळेच ओळख मिळाली,
मी ठाम ऊभा.
बंद पुस्तकं मुकी नसतात.
दडलेले असतात त्यात अजूनही काही
शब्द,
ज्याचे अर्थ वाचल्यावरच
समजू लागतात हळूहळू.
तुला समजायला हा जल्म ही कमी पडतोय. हे खरं..
✍️ *सुनील लोणकर
(आईच्या स्मृतीदिनी.. 🙏)
॰॰॰॰
५.
कदाचित हेच खरं
जेव्हा केव्हा ही पाहतो मी तिला
शोकेस मधील वस्तू, ,स्वच्छ साफ करतानां,
त्यावरील धूळ झटकताना.
त्यात मुलाची ती काही खेळणी,
फ्लाँवर प्लाट मधील फुलाचे काही
गुच्छ,
स्पर्शाने तिच्या पुन्हा सतेज ताजी
वाटू लागतात.
खरतरं गोंजारते ती आपुलकी ने त्याना
तेव्हा चकचकीत होतात निर्जीव वस्तू
ही.
तेव्हा मला आठवते तिच्यातील एक आई.
जी कधीकाळी आपल्या लेकरांना ही
असचं कुरवाळत असायची मायेनं
छातीशी बिलगून असायची ती पिलागत.
ते जिवंत क्षणभराचेच स्पर्श,
आधार दिलासा द्यायचे,
पुरेसे असायचे फुलायला.
आज या घडीला मात्र,
ती लेकर मोठी होऊन, परिस्थितीनीरुप तिला
विलगलेली,
विसावलेली दूरच्या गावी.
निर्जीव वस्तूना ऊजळायला जसा हवा
असतो स्पर्श,
तसं आसुसत असतील का अजून तेही सजीव
मायेच्या ओढीन ,तिच्या स्पर्शासाठी ?
हे ऊगीचच मला वाटतं.
खरतरं काही प्रश्न अनुत्तरीत
ठेवायचे असतात कायमचे.
धूळ जसी साचू द्यायची नसते वस्तूवर,
तसच मनालाही खचू द्यायच नसतं दूरवर.
जपायच असत हळवेपण,
पण यायच असत भानावर.
कदाचित हेचं खरं.
✍️ *सुनील लोणकर
![]() |
| Dr. Raosaheb Dhawale, Sunil Lonkar & Dr. Akshay Ghorpade |
.







सदर ब्लॉगवर कवी सुनील लोणकर यांनी मला व्हाट्सअपला दिलेली प्रतिक्रिया पुढील प्रमाणे आहे.
उत्तर द्याहटवाक्या बात..
अनोखा, वेगळाच अन्दाज हा,,
शब्दा भोवती अर्थासाठी फिरणारे आम्ही कवी, लेखक, वाटतय भरकटत जातोय, कि वाट चुकतोय, चाललोय कुठ, जायच कुठ, अश्या भ्रमंतीत सदा सर्वदा, मात्र या पायवाटेवर, प्रज्ञेची मुळाक्षरे जी सोबत, पाठलाग करतात, ती कविला दिशाहिन होऊ न देता दिशावर्धक, ठरतात.
.. कवीला स्वतः आपली नव्याने ओळख होतेय यातून. स्वतःच्या बाबतीत त्याचे जे आडाखे, तो आखतो त्याचे ईतर पैलू ही, असू शकतात ते या ब्लाग मध्ये ऊलगडते.
... अक्षराच्या मुळाचा शोध, ऊगम, ज्याला जमलाय तो अक्षय, अक्षय घोरपडे..
एके काळी माझे गुरू, मार्गदर्शक स्व. किशोरजी घोरपडे याचे सुपुत्र..
. अक्षय ज्या तळमळीने, पण अभ्यासपूर्ण ईतराच्या बाबतीत
तो जे लिहतोय, जो मागोवा घेतोय, कविते वर च एक त्याच प्रगाढ प्रेम, कवितेला आपुलकी ने तो जे गोंजारतोय, ईतराच्याही, अगाध हे.पिताश्रीचा वारसा चालवतोय, त्याने जो हा वसा घेतलाय, जे व्रत स्विकारलेय, जे मन मोठ केलय, स्वतः पलीकडे पाहण, जे टिपलय ते त्या कवीपर्यत पोहचविण, हि लिलया अफलातून, अक्षय ने साधलीय.
माझ्या हिन्दी, ऊर्दू गजल, मराठी कविता अवलोकनार्थ ज्या निवडल्यात, आश्चर्य मला ही वाटलं, हुबेहूब मनातल्या माझ्याच ह्या कविता, म्हणजे सावडायच काय, निवडायच काय हे नेमक गवसलय त्याला, तो मनकवडा असही म्हणता येईल.
मला माझीच ओळख नव्याने करून दिल्या बद्दल, श्री अक्षय घोरपडे याचे मनापासून आभार, धन्यवाद.. निश्चित मला हे ऊभारी देणारे, प्रेरक..
. ईसके जरिए दर्द और निखरेगा, फिरसे ऊभर आयेगा, एक नयी ऊमंग लिए, जानता है वो, मायूसी से बेहतर, होता है, है दर्द..
.. सुनील लोणकर. "दर्द "जालना 👍🙏
लय म्हणजेच लै भारींच की कविवर्य लोनकर जी आपल्या कवीता ऐकण्यास छान असतात‼️
उत्तर द्याहटवाआपली कविता ही प्रपंच तरलतेने येते.कविते विषयीचे प्रज्ञेय भाव चिंतन
उत्तर द्याहटवाकरायला लावतात.. अक्षय जी ने आपल्या सृजनशील शब्दांकित प्रतिभावान भाव मांडला.. अभिनंदन अभिनंदन मनस्वी हार्दिक शुभेच्छा
आपल्या सर्वच कविता खूप सुंदर अगदी मनाला भावणाऱ्या आहेत सर... खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छ्या...
उत्तर द्याहटवाकवी पांडुरंग मुंजाळ