गुरुवार, १४ मे, २०२६

चिमणीची टोपी

 चिमणीची टोपी 


चिमणी म्हणते 

चिव चिव 

कावळे दादा 

टोपी शिव ||


कावळा म्हणतो 

काव काव 

घेऊन ये 

चहा पाव ||


कावळ्याने शिवला 

टोपीला गोंडा 

चिमणी म्हणते 

कर तो छोटा ||


चिमणीला दिसते 

टोपी छान  

कावळ्याची झाली 

ताठ मान ||


कावळ्याचे झाले 

कौतुक खूप 

माकड म्हणते 

हूप हूप ||

 --डॉ. अक्षय घोरपडे.


टीप : सदर बालगीत हे डॉ. अक्षय घोरपडे यांनी लिहिलेले असून या गीताचे सर्व कायदेशीर हक्क हे  डॉ. अक्षय घोरपडे यांचे आहेत. 

सदर बालगीताची युट्यूबलिंक दिलेली आहे. https://youtu.be/rzi1fpqmbNE?si=pAfz9UDquR-TKEUA




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

जागतिकीकरण आणि आदिवासी

  जागतिकीकरण आणि आदिवासी डॉ . अक्षय किशोर घोरपडे. ·        गोषवारा  (Abstract) :- १९९० नंतरचा कालखंड हा भारतीय समाज जीवनात फार मोठा सा...