शुक्रवार, १४ नोव्हेंबर, २०२५

कामगार जीवनाचे चित्रण करणारी कविता : सत्याला ग्लानी का आली ?

 

त्याला ग्लानी का आली ?

बदलत्या कामगार जीवनाचे चित्रण करणारी कविता

डॉ. अक्षय किशोर घोरपडे.

कविता,था,  वैचारिक, समीक्षा, संशोधन, संपादन आणि प्रकाशन आदी क्षेत्रात स्वत:ला स्थापित केलेल्या महेंद्र गायकवाड यांचा त्याला ग्लानी का आली?' हा काव्यसंग्रह प्रकाशित झा‌ला आहे. महेंद्र गायकवाड हे २००० सालानंतरच्या कालखंडातील कवी म्हणून ओळखले जात असले तरी त्यांचा कवितेच्या जडण‌घडणीचा कालखंड हा १९९० नंतरचा आहे हे लक्षात घेणे गरजचे आहे. १९९० ते आजतागायत समाजजीवनात झालेल्या बदलांची नोंद ते आपल्या साहित्यकृतीतून घेत असतात. कवी हा सात‌त्याने वर्तमानाची नोंद व खल घेत असतो. वर्तमानातले ताणेबाणे, अंतर्विरोध यातून निर्माण झालेली विसंगती ही कवीच्या निर्मितीची क असते किंबहुना ट्रीगर पॉइंट असतो असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. १९९० नंतरचा कालखंड फार मोठ्या, सामाजिक बलाचा कालखंड आहे. दशकभरानंतरच या बदलाची व्याप्ती तीव्रतर दिसते, केवळ सामाजिक, राजकीय पातळीवरच नव्हे तर ज्ञान आणि तंत्रज्ञानातही हा बल उमटून दिसतो. काजव्यांच्या खांद्यावर संगिनी, ओलील ठेवलेली माणसे, जगणे असह्य झाले !', 'अस्तित्व गमावलेली माणसे या त्यांच्या प्रकाशित काव्यसंग्रहाची शीर्षक पाहिली तरी कवीने या कालखंडातील बलाची सूक्ष्मपणे नोंद घेतलेली दिसून येते. या रांगेतच आपल्याला सत्याला ग्लानी का आली?' या त्यांच्या नव्या काव्यसंग्रहाचा समावेश करावा लागतो.



सदर काव्यसंग्रहाचे शिर्षक हे प्रश्नार्थ असून सद्य परिस्थितीवर  कवीने नोंदविलेली निष्कर्ष वजा प्रतिक्रीया आहे. सत्य आहे आणि सत्याला ग्लानी आलेली आहे. आणि ही ग्लानी का ली यासाठी कवीचा शोध हे. ग्लानी येणे म्हणजे मूर्च्छित होण्यापर्यंत थकवा येणे होय. अतिशय श्रमाने किंवा अती भावनि बावाने ग्लानी व्यक्तीला येत असते. विशेषत: भावनाचे व्यवस्थापन नीट न झाल्याने किंवा भावनांचा दाब सहन न झाल्याने ग्लानी येणे हे व्यक्तीसाठी स्वाभाविक आहे. परंतु सत्याला कशी का ग्लानी येऊ शकते ?  सत्य तर सत्य आहे. त्याला जैविक भावना नसून ते भौतिक आहे. अटळ आहे. अपरिवर्तनीय आहे. त्य हे सूर्यप्रकाशासारखे प्रखर आणि स्वच्छ असते. अशा सत्याला ग्लानी कशी काय‌ येऊ शकते? हा खरा प्रश्न् हे आणि तो कविने उपस्थित केलेला आहे. कविने हा प्रश्न उपस्थित केला आहे म्हणजेच त्यात काहितरी तथ्य आहे. निश्चित सत्याला ग्लानी लेली आहे. आणि ती ग्लानी का आली या विषयी आपल्या मनोगतात कवी म्हतो, "सत्याला ग्लानी का आली? सत्याला ग्लानी येण्याची अनेक कारणे आहेत, काळ्याचे पांढरे करणारी व्यवस्था पैदा झाली. जिकडे तिकडे सत्याची कोंडी करून असत्याचा गौरव करणारी परंपरा निर्माण झाली. आणि सत्याच्या गुणधर्माला डावलू असत्याचा उदो उदो होतो. त्यामुळे सर्वसामान्य माणूस हतबल होऊन त्याच्या पदरी निराशाच पडते.”  कवीचे हे निरीक्षण वर्तमान समाजजीवनातून आलेले आहे. असत्याचा गौरव करणारी परंपरा निर्माण झाल्यामुळे सत्याला ग्लानी आली असे त्यांचे त्यांच ढोबळ निरीक्षण आहे. आधीच म्हटल्याप्रमाणे कविच्या निरीक्षणात तथ्य असून त्या तथ्याचा शोध घेताना असे दिसते की, सध्याचा कालखंड हा सोशल मिडीयाचा कालखंड आहे. कुठलाही आकार घेणाऱ्या अमीबासारखा सोशल मिडीया आहे. आणि ऑक्टोपस सारखे आठ- नऊ हात त्याला असून तो तुमच्या मन आणि मेंदूवर घट्ट पकड करतो.

साधारणपणे फेसबुक, व्हाटस अप, ट्विटर (X), इंस्टाग्राम, युट्यूब यांचा आपण सोशल  मीडीया म्हणून उल्लेख करतो. या सोशल मीडियाची जमेची बाजू म्हणजे या मिडीयावर प्रत्येकाला अभिव्यक्त  होता येते.  आपली मते मांडता येतात. आपली बाजू भक्कम करता येते. समाजजीवनात या माध्यमांच्या माध्यमातून आपले विचार सज पसरवता येतात. लाखो करोडो लोकांपर्यंत काही सेकंदात तुम्ही पोहचता आणि तुमच्या वक्तृत्व अवा मांडण्याची शैली असेल तर लोकांना तुमचे मत तुम्ही सहजचं टवूनही देऊ शकता. तुम्ही मांडलेल्या मतांना लाईक, कमेंट आणि ते इतरांशी इतर व्यक्तीही शेअर  करू शकतात. ही सर्व तात्कालिक प्रक्रीया आहे. हातातल्या मोबाईल सारख्या साधनांच्या माध्यमातून ही प्रक्रीया सुर होते. वास्तविक संज्ञापन क्षेत्रात ही महत्वाची क्रांती होय. परंतु या क्षेत्राचा जसा सकारात्मक वापर सुरु आहे त्यापेक्षा कित्येक पटीने अधिक नकारात्मक वापर सुरू आहे. प्रत्येक गोष्टीला विविध आयाम व बाजू असतात त्यातली सत्याची सात्विक बाजू घेणाऱ्याची संख्या ही मुळातच  आदिम काळापासून कमीचं आहे. असत्याची किंबहुना स्वत:च्या फायद्याची बाजू घेणाऱ्याची संख्या ही अधिक असते. अशी प्रवृत्ती समाजात विघातक बाबी निर्माण करण्यात तरबेज असतात. त्यांना फक्त त्यांचा स्वार्थ प्रिय असतो.  त्यासाठी लाखो लोकांचे नुकसान झाले तरी हरकत नाही अशी त्यांची मनोवृत्ती असते.  सोशल मिडीयाच्या या कालखंडात अशी मनोवृत्ती जोरसपणे उफाळून आले‌ली आहे.  आणि या मनोवृत्तीने सत्याची कास धरणाऱ्यांची कोंडी केलेली आहे. या कोंडीमुळे सत्याला ग्लानी आली, असे आपल्याला म्हणता येते.

आर्त हाकेने

वर्तमान अस्वस्थ होतोय

माणूसकीची गळचेपी केल्या जाते

असे होत असतांना

‘स्वान्त सुखाय कसा म्हणू?" (अयोग्य, पृ.१६)

सत्याची का धरणाऱ्या माणूसकीची गळचेपी केल्या जातेय.

बुद्धा!

करुणा / शांती / अहिंसा आणि सत्याला

ओलीस ठेवून

अयोग्य प्रदूषणे पसरली सर्वत्र

मुजोरीचा माज चढला म्हणून" (अयोग्य, पृ.१६)

मग माणुसकीचा री ढणारा व्यक्ती स्व:ला स्वान्त सुखा सा म्हणू शकेल ?

सत्याची गळचेपी करणारी ही प्रवृत्ती आधीपासूनच मुजोर असते, छद्मी मुखवटा  घालून ही प्रवृत्ती समाजात वावरत असते.  मुखवटयाआड असणाऱ्या या प्रवृत्तीला जाती, धर्म, वर्णश्रेष्ठत्वाची किनार असते. आपल्या आधिपत्याखाली असणाऱ्या लोकांना गुलाम करून त्यांची छळछावणीत रवानगी करण्यासाठी ते तत्पर असतात. वरकरणी अहिंसा परमोधर्मी या तत्वाचा जप करतात आणि दुसऱ्या क्षणी माणूस मारतात का तर असभ्य परंपरा टिकून राहावी म्हणून कारण या असभ्य परंपरे त्यांचे अहंमन्यतेचे कृतक बुरुज टिकून राहतात. वीला हा असभ्य परंपरा नको आहे.

“‘सत्यमेव जयते' म्हणता म्हणता

असत्य कोड  फुटल्यासारखे

 पसरत चालले जगभर

म्हणून मी दगान करतो

सुजलाम सुफलाम् माणसाच्या प्रदेशासाठी (गान,  पृ.३३)

सुजलाम सुफलाम् माणसाच्या प्रदेशासाठी कवी सत्याची कास धरून आहे. माझा स्वाभिमान जिवंत हे ही कवीची दर्पोक्ती नसून स्वभावोक्ती हे. कवीचा स्वभाव हा विद्रोही असून माणूसकीच्या भल्यासाठी कवीचा विद्रोह आहे आणि म्हणूनच मग तो

तुम्ही लावलेल्या नियम/अटीशी

असहमत आहे

मी काहीही हो

उल्लंघन करणार आहे.

सत्यमेव जयतेसाठी” (विद्रो, पृ.४४)

सत्याला वारंवार ग्लानी ली तरी सत्याला आलेल्या ग्लानीचे उल्लंघन करून सत्यमेव जयते‌साठी कवी तत्पर आहे. या लढाईत हितसंबंधांशी डजोड करणाऱ्यांना तो मित्र म्हणवून घेत नाही. यापेक्षा मी एकटा बरा/ काही ही होवो/कोळसा / टिकास/ फावडा सख्खे सोबती"  सोबत आहेत असे कवीला वाटते.

महेंद्र गायकवाड


र काव्यसंग्रहातील कवितेला कामगार कविताही संबोधता येते. कारण यातील बहुतांश कविता ही काम‌गार जाणिवेला अभिव्यक्त करते. महेंद्र गायकवाडांच्या धिच्या काव्यसंग्रहाच्या तुलनेत या काव्यसंग्रहा कामगार जाणिवेची कविता विपूल आलेली आहे. मध्यंत्तरीच्या काळात आणि आताही  कामगार जाणिवेच्या साहित्याची निर्मिती संको पावत आहे. किंबहुना कामगार जाणिवेच्या साहित्याची निर्मिती थांलेली आहे असे एक चित्र मराठी साहित्यात दिसते. या चित्राच्या पार्श्वभूमीवर विचार करता महेंद्र गायकवाडांच्या कवितेचे महत्व ठळकपणे उजागर होते. आमच्या समाजजीवनातून कामगार गायब झाला आहे की काय अशी शंका निर्माण होत आहे. कामगार कोठे गायब झाला? आणि कामगार कोणा म्हणावे? हे खरे प्रश्न आहेत. कवी कामगाराबद्दल बोलतांना म्हणतो,

"तू जगातल्या हरेक वस्तूचा निर्मितीकार हे

हे निर्विवाद सत्य आहे.

तू कारागिर/वेल्डर/मोल्डर / फिटर/ विणकर / लोहार/सुता

गवंडी / लेबर/ मिस्त्री / स्थापत्य / कला / शिल्प इत्यादीची

गाथा समजून घेताना

तू शोषित रतो. (मजूर, पृ.२५)

कामगार हा ज‌गातल्या हरेक वस्तूचा निर्मितीकार आहे. हे निर्विवासत्य मान्य करावेच लागते. कारखान्यात यंत्र हाताळतो तो कागार. कला, स्थापत्य, शिल्पांची नवनिर्मिती करतो तो कामगार. हत्यार, अवजारांच्या साहित्याने निर्मिती करणारा प्रत्येकजण कामगार असतो असे ढोबळमानाने आपण म्हणू शकतो. परंतु हा  कामगार वर्तमान व्यवस्थेत दुर्लक्षित आणि गायब झालेला आहे.  औद्योगिक क्रांतीचा प्पा ओलांडून समा आता संगणक क्रांतीच्याही पुढे कृत्रिम बुद्धिमतेच्या युगाकडे वाटचाल करत आहे. संगण क्रांती आणि कृत्रिम बुद्धिमतेने कामगाराची व्याख्याच बललेली आहे. निळ्या किंवा खाकी वस्त्रात यंत्राजवळ काम करणारा कामगार अजुनही अस्तित्वात आहे. परंतु दुर्लक्षित आहे. कारण त्याची जागा आता सुटाबुटातील सॉफ्टवेर कंपन्यात काम करणाऱ्यांनी घेतली आहे. आणि हे सुटाबुटातील लाखोंचे पॅकेज मिळविणारे लोक स्वत:ला कामगार म्हणवून घेत नाहीत. समाजात  कामगारांची प्रतिमा ही कमी शिक्षीत, यंत्रावर काम करणारा, त्यार अवजार वापरणारा, काम करतांना हात घाण झालेला, कारखान्याच्या शिफ्टनुसार काम करणारा अशी आहे. आणि या प्रतिमेनेच कामगाराचे हनन केलेले आहे.



सोशल मिडीया म्हणून ज्यांचा आपण गौरवाने उल्लेख केलेला आहे. त्या मुळात प्रचंड नफा  कमावणाऱ्या सॉफटवेअर कंपन्या आहेत. यंत्राधिष्टीत कंपन्यांचा पुढचा टप्पा म्हणून सॉफ्टवेअर कंपन्याकडे पाहिले जाते. भले ही या दोहोतील कामाचे स्वरूप आणि यंत्राची हाताळणी वेगळी असेल परंतु कंपनी सॉफ्टवेअर असो की हार्डवेअर उत्पादनातून नफा कमावणे हेच तिचे उद्दिष्ट असते. हाच नियम कंपनीत काम करणाऱ्यानाही लागू व्हायला हवा. परंतु तसे न झाल्याने पारंपरिक कामगार मागे पडत आहे. सॉफ्टवेअर कंपनीत काम करणारा व्यक्ती स्वतःला कामगार म्हणवत नाही. स्वत:ला कामगार म्हणवून घेणे त्यांना हीनपणाचे वाटते. लाखो रुपयांच्या पॅकेजच्या मुखवट्यात ते आपला कामगार चेहरा लपवतात. त्यांच्या या दुटप्पी वागण्यामुळे भांडवलशाहीने पुन्हा उचल खाल्ली.

 "कालपर्यंत कंपनीच्या गेटवर

मोठ्या दिमाखाने ट्रेड युनियनचा फडकत असलेला झेंडा

ज भांडवलशाही पुढे झुकला

अन् पुन्हा कामगारांच्या जखमा ओल्या झाल्यात." (ओल्या जखमा, पृ.२६)

मुजोर भांडवलशाहीला मान वर काढण्यासाठी दुटप्पी माणसंच कारणीभूत असतात ती अशी की, ‘ढेकर देत गरिबीबद्दल गप्पा मारणारे लोक घरकाम करणाऱ्या मोलकरणीचा कधीच पगार वाढवत नाही?’ या दुटप्पी नीतीमुळे मुजोर भांडवलशाहीचे फावले त्यांनी स्वतःचा फायदा असणारी अर्थनीती तयार केली. या अर्थनीतीत कामगार बाद झाला. कामगारांच्या हक्कांचे संरक्षण करणारे कायदे कानून लवचिक बनवले. संघटनांचे पदाधिकारी फितूर झाल्याने ट्रेड युनियन मोडकळीस आल्या. ‘०१ मे कामगार दिवस साजरा करता करता १७ सप्टेंबर विश्वकर्मा जयंती कामगाराचा श्रम दिवस म्हणून पाळला एकंदरीत काय तर शोषकाचा ललेला खुटा पुन्हा एकदा मजबूत झाला.’ कल्याणकारी राज्याची भूमिका सोडून सरकारच जर भांडवलशाहीशी मैत्रीपूर्ण करार करत असेल तर ‘शोषकांना बहर येताहे’ हे कवीला मार्क्सला उद्देश्यून म्हणावेच लागेल.

कामगारांच्या हक्कांचे हनन करणारी ही अर्थनीती कवीला मान्य नाही. तो म्हणतो,

“ए मालकांनो

तुम्ही बेरोजगारी / असमानतेची नीती/दमदाटी

ह्यांना आळा घाला

अन्यथा

आमच्या पोलादी श्रमाने

भूगोल हलवून टाकू" (हलवू, पृ.२४)

जातीनिहाय, विचारप्रवाहानिहाय विभागणी करून कामगारांमध्ये फूट पाडणारी ही मालकांची नीती 'जुरांचा सासारखा चोथा करणारी आहे म्हणून हातात अवजार असलेला कवी मजुरांना ‘हे मजूरा ! आता घे पंगा, कर दंगा त्यांच्याविरुद्ध’ कारण ‘तेंव्हाच मजुरविरोधी नीती लाईनदोरी सारखी सर होईल.

मल्टिनॅशनल सॉफ्टवेअर्स कंपन्यांनी कामगारांना तर संपवले शिवाय सोशल मिडीयाच्या माध्यमातून समाजात संभ्रमावस्था निर्माण केली. सूर्यप्रकाशासारख्या स्वच्छ असणाऱ्या सत्याची मोडतोड करून त्याला नव्याने प्रसवले जाते. त्यामुळे नेमकी कोणती बाजू सत्याची आहे, ग्राहय आहे आणि नेमकी कोणती बाजू असत्याची आहे, अग्राहय आहे हे ठरवण सामान्यांना शक्य होत नाही. सत्याच्या मोडतोडीतूनच सत्याभोवती दाट धुके निर्माण केले जाते. या धुक्यात सत्याची स्वच्छ प्रतिमा झाकाळून जाते. व्यक्ती संभ्रमावस्थेत जातो. सत्याची तो नीट पारख करू शकत नाही म्हणून सत्याला ग्लानी ली आहे. सत्याला ग्लानी आली की मुठभर लोकांना स्वतःचा स्वार्थ साधता येतो आणि म्हणून कंपू करून ते सत्याला ग्लानी आणण्यासाठी  धडपडत असतात. फार पूर्वीपासून सत्याला ग्लानी आणण्याचे प्रयोग केले जात आहेत परंतु काळाच्या प्रभावात हे प्रयोग निष्प्रभ ठरले, परंतु सोशल मिडीयाच्या या जमान्यात या प्रयोगांना बहर आला आहे. परिवर्तनाची, प्रबोधनाची, विचार स्वातंत्राची परंपरा यामुळे अडचणीत सापडली असून कालांतराने ती समृद्ध अडगळ होते की काय अशी शंका संवेदनशील मनामध्ये निर्माण होत असते.

सत्याला ग्लानी आणणाऱ्या या व्यवस्थेत माणूस कुजवला जात आहे आणि तो धर्मात कुजवला जात आहे. ‘अद्यापही  Castless society चे स्वप्न माणसांना का डत नाही, नैतिकतेचा टॅग लागलेली माणसं अंधारात दिसतात तेंव्हा सज्जनतेला तडा जातो. विश्वासाचा अनाकलनी मृत्यू होतो. रोजगार हद्दपार करून भांडवलदार दात विचकत आहे. रोजगार नाही म्हणून मुलगा कचकचीत शिवी हासडत आहे. धर्माच्या बेटावर द्वेषाचे प्रद‌र्शन भरवल्या जात आहे. शांती अहिंसेचे बुरुज ढासळताहे, अशा व्यवस्थेत समाजाची उन्नती कशी होणार? या व्यवस्थेचे समाजाचे भविष्य काय ? असे असंख्य प्रश्न महेंद्र गायकवाडांची कविता उपस्थित करते.

कवी महेद्र गायकवाडांच्या कवितेचे वैशिष्ट्य म्हणजे अल्पाक्षरत्व. कमी शब्दात, कमी ओळीत व्यापक जीवनाशय मांडण्याचे कसब त्यांच्या कवितेत आहे. ही कविता विधानात्मक असून धक्कादायक विधानांनी त्यांची कविता संपते. उदा. आता अंगुलीमाल कशी दिक्षा घेणार?’, 'मी अद्यापही पृथ्वीच्या पोटात काळा कोळसा होऊन जगतो, अजुनही माझ्याजवळ अवजार आहे?’,  पुन्हा कामगाराच्या जखमा ओल्या झाल्या.’ ‘आंबेडकरी अनुयायी आहे म्हणून’, 'अर्थनीतीचे शांतपण मुके घेतो?’, 'ती खजुराहोचे शिल्प होऊन जाते, 'मी एक ग्लोबल वर्तुळातील मध्यबिंदू’  यासारखी विधाने नुसतीच धक्का देत नाहीत तर निकर्षवजा निरीक्षण नोंदवतात, विचारप्रवर्तन करतात.

आंबेडकरी जाणिवेची कविता लिहिणा-या महेंद्र गायकवाडांनी सदर काव्यसंग्रहात आपल्या जीवनाशयाचा परीघ व्यापक केला आहे. वर्तमान कालखंडातील विविध प्रश्नांना प्रतिक्रिया देणारी त्यांची कविता सोशल मिडीयाने सत्याला आणलेल्या ग्लानीचे विदारक चित्रण करते. ही कविता केवळ प्रश्नच उपस्थित करत नाही तर या प्रश्नातून बाहेर पडण्याचा मार्ग ही सांगते. हा मार्ग अहिंसक असून मानवमुक्तीचा आहे. शोष‌णाविरुद्धचा आहे. अलिकडच्या काळात कागाराच्या जीवनात झालेल्या बलाचे सुक्ष्म निरीक्षण या कवितेत पाहावयास मिळते. या अनुषंगाने विचार केला तर कामगार कविता म्हणूनही आपण या कवितेचा उल्लेख करू शकतो.

                                                सत्याला ग्लानी का आली?’ - महेंद्र गायकवाड

संघर्ष प्रकाशन, नागपूर,

आ. १ली, २०२५, मूल्य १००.

४ टिप्पण्या:

जागतिकीकरण आणि आदिवासी

  जागतिकीकरण आणि आदिवासी डॉ . अक्षय किशोर घोरपडे. ·        गोषवारा  (Abstract) :- १९९० नंतरचा कालखंड हा भारतीय समाज जीवनात फार मोठा सा...