काव्यप्रकार : वृत्तबद्ध रचना
बालकविंच्या 'फुलराणी' या कवितेवरील 'फुलराणी: मराठी कवितेला पडलेले एक अद्भूत स्वप्न' या ब्लॉगला वाचकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. ही कविता वृत्तबद्ध असल्याने या कवितेच्या आकृतिबंधाविषयी अधिक माहितीची मागणी प्रतिक्रियेच्या माध्यमातून वाचकांनी केली, त्यामुळे या कवितेचे वृत्त आणि एकूणच वृत्तबद्ध रचना कशी असते ? हे या ब्लॉगमध्ये जाणून घेऊ या.
पद्यरचना ही मुख्यतः पुढील प्रकारात केली जात असते. १) छंद २) जाती ३) वृत्त ४) मुक्तछंद
१) छंद
:
केवळ अक्षरसंख्येचे बंधन असलेले पद्य म्हणजे छंद.
२) जाती :
केवळ मात्रांच्या संख्येचे बंधन असलेले पद्य म्हणजे जाती.
३) वृत्त :
अक्षरसंख्या ठरावीक असून त्या अक्षरांतील लघुगुरू क्रमही ठरावीक असण्याचे बंधन ज्या पद्यावर असते ते वृत्त होय.
४) मुक्तछंद :
छंदाचे बंधन न पाळता केली जाणारी रचना म्हणजे मुक्त छंद.
वरील चारपैकी आधीच्या तीन पद्यरचना प्रकारांचा अभ्यास करावयाचा असेल तर काही संकल्पना समजून घेणे गरजेचे आहे. त्या संकल्पना म्हणजे मात्रा,गण, लघु, गुरू, यती या होय, अनुक्रमे त्यांचा आपण विचार करू.
Ø मात्रा :
एखाद्या अक्षराचा उच्चार करण्यास जो कालावधी किंवा वेळ लागतो त्यास मात्रा असे म्हणतात.
अक्षरात ऱ्हस्व आणि दीर्घ असे दोन प्रकारचे उच्चार असतात. त्यांना पद्याच्या भाषेत लघू आणि गुरू असे म्हणतात.
उदा. अ, इ, उ, ऋ या हस्व उच्चारल्या जाणाऱ्या स्वरास, क, कि, कु या व्यंजनास 'लघू अक्षरे' म्हणतात.
अ, आ, ई, ऊ, ऐ, ओ, औ या स्वरांस आणि का, की, कू, कै, के, को यासारख्या व्यंजनास 'गुरू अक्षरे' म्हणतात.
लघू अक्षराची एक मात्रा व गुरू अक्षराच्या दोन मात्रा मोजतात. लघू अक्षर (ᴗ) अशा अर्ध चंद्राकृती खुणेने तर गुरू अक्षर (-) अशा आडव्या रेघेने दाखवतात.
उदा. राग = रा ग
यात 'रा' हा दीर्घ असल्याने २ मात्रा मोजायच्या आणि
ᴗ –
'ग' हा हस्व असल्याने १ मात्रा मोजायची अशा एकूण = ३ मात्रा.
२) उदा. ज्ञानप्रकाश = (– ᴗ ᴗ – ᴗ) यात 'न' ची मात्रा एकच आहे. त्याच्यापुढे 'प्र' जोडाक्षर आले असले तरी त्याचा आघात मागील अक्षरावर (म्हणजे 'न'वर) होत नाही.
३) जोडाक्षरातील शेवटचा वर्ण ऱ्हस्व असेल तर ते जोडाक्षर ऱ्हस्व मानावे.
उदा. भास्कर (– ᴗ ᴗ)
शेवटचा वर्ण दीर्घ असेल तर दीर्घ मानावे. उदा. इच्छा (– –)
४) लघू अक्षरावर अनुस्वार येत असेल किंवा विसर्ग येत असेल तर ते गुरू मानावे.
५) कवितेतील शेवटी येणारे लघू अक्षर दीर्घ उच्चारले जाते. म्हणून ते दीर्घ मानावे व त्यास गुरू (–) अशी खूण करावी.
Ø गण:
पद्याच्या चरणातील अक्षरांचा लघू गुरू क्रम मांडून वृत्ताची लक्षणे ठरविताना त्यातील तीन अक्षरांचा एकेक गट करून तो मांडण्याची पद्धत आहे. यांनाच गण असे म्हणतात. गण म्हणजे कवितेतील अक्षरे मोजण्याचे माप, या तीन अक्षरांच्या गटात काही अक्षरे लघु, तर काही अक्षरे गुरू असणार म्हणून तीन अक्षरी शब्दांचे लपू गुरू क्रमाने एकंदर आठ गण पडतात. 'यमाताराजभानसलग' या एका सूत्रात सर्व गणांची लक्षणे एकत्र गोविलेली आहेत. यातील प्रत्येकी तीन अक्षरांचे पुढीलप्रमाणे आठ गण पडतात.
यमाता = ᴗ ᴗ –
= आद्य लघू = 'य' गण
मातारा = –
– – = सर्व गुरू = 'म' गण
ताराज = –
– ᴗ = अंत्य लघू = 'त' गण
राजभा = –
ᴗ – = मध्य लघू = ‘र’ गण
जभान = ᴗ – ᴗ = मध्य गुरू = 'ज' गण
भातस = – ᴗ ᴗ = आद्य गुरू = 'भ' गण
नसल = ᴗ ᴗ ᴗ = सर्व लघू = 'न' गण
सलग = ᴗ ᴗ – = अंत्य गुरू = 'स' गण सलग
Ø यती :
कवितेचा चरण म्हणत असताना आपण मध्येच काही अक्षरानंतर थांबतो. या थांबण्याच्या
जागेला किंवा विरामाला यती असे म्हणतात. ज्या क्रमांकाच्या अक्षरानंतर आपण थांबतो त्या
क्रमांकाच्या अक्षरावर यती आहे असे वर्णन करतात.
या संकल्पना नीट
समजावून घेतल्या की मग आपणास छंद, अक्षरगणवृत्त, मात्रावृत्ताचा अभ्यास नीट करता येतो. छंद आणि
अक्षरगणवृत्त, मात्रावृत्त यांत विविध प्रकार आहेत. विस्तारभयास्तव
आपण फक्त येथे मात्रावृत्तातील पादाकुलक वृत्ताचाच विचार करणार आहोत.
मात्रावृत्त
मराठीत ज्यांना
आपण पदे म्हणतो त्यांचा समावेश मात्रावृत्तात होतो. पदाशिवाय सलग वर्णन करताना
म्हटले जाणार कटाव, फटके, भूपाळ्या, आरत्या, अंगाई गीते, पोवाडे, समरगीत, लावण्या अशा सर्वांचा समावेश
मात्रावृत्तात करतात.
मात्रा कशास म्हणतात व त्या कशा मोजतात हे आपण आधी पाहिलेले आहे. 'ज्या कवितेच्या चरणात अक्षराचे व गणाचे बंधन नसून केवळ मात्रांचे बंधन असते त्यास मात्रावृत्त किंवा जाती असे म्हणतात.' मात्रावृत्तात ठरावीक मात्रांचे सर्व चरण असतात असे नाही. निरनिराळ्या मात्रावलीचे भाग एकत्र केलेले असतात.
पदात प्रारंभी ध्रुवपद अशी रचना असते. पदे म्हणताना आपण ताल
धरतो, म्हणजे ठरावीक अंतरावर थांबतो व टाळी वाजवितो, यावरून मात्रांचे गट पडतात.
चरणातील मात्रा मोजताना
कधी कधी आठ मात्रांचा किंवा सहा मात्रांचा असे गट किंवा गण पडतात.
आठ मात्रांच्या
गटाला ‘पद्म’ असे म्हणतात. (पद्म = कमळ, आठ पाकळ्या असतात.) व ते 'प' अक्षराने दाखविले जाते.
सहा मात्रांच्या
गटाला ‘भृंग’ म्हणतात. (भृंगाला सहा पाय असतात.) हा गढ़ 'भृ' अक्षराने दाखवतात.
चार किंवा पाच मात्रांच्या गणाला (कवळ लिंब) 'क' असे म्हणतात, मात्रावृत्तांच्या चरणात पद्माचा किंवा भृंगाचा एकच गट न येता अनेक गट येतात, त्यांना आवर्तन म्हणतात.
Ø पादाकुलक वृत्त :
उदा. हिरवे हिरवे
गार गालिचे
|
हि र वे |
हि र वे |
गा र |
गा लि चे |
|
ᴗ ᴗ – |
ᴗ ᴗ – |
–
ᴗ |
–
ᴗ – |
|
१ १ २ |
१ १ २ |
२ १ |
२ १ २ |
|
८ |
८ |
||
|
प |
प |
||

खूप अभ्यासपूर्ण मांडणी केली आहे सर
उत्तर द्याहटवाThank you !
उत्तर द्याहटवा